Ad will apear here
Next
विवेकानंद कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी अशा भित्तिपत्रिकेची आवश्यकता असते. राज्यशास्त्र विभागाने राजकीय व्यवस्था व सामाजिक मूल्याचा विचार करणारी ही भित्तिपत्रिका निर्माण करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली आहे. आजचे जग गतिमान असून दररोज नवनवे बदल होत आहेत. नवीन विचारसरणी समाजात रुजत आहे. या सर्वांचा विचार समाजहित लक्षात घेऊन करणे म्हणजे सामाजिक बांधिलकी स्वीकारणे होय.’

या प्रसंगी प्रा. बी. के. गोसावी, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. ए. पवार यांनी केले. प्रा. समीक्षा फराकटे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZYMBG
Similar Posts
‘विवेकानंद’मध्ये ‘जीएसटी’वरील कार्यशाळा कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ व अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजने अंतर्गत ‘भारतातील कररचना व जी.एस.टी.’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. एस. कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले
‘शिक्षक समाज आणि संस्कृतीचे पालकत्व स्वीकारतो’ कोल्हापूर : ‘अत्यंत त्यागमय भावनेने कष्टाळू वृत्तीने विद्यार्थी घडवणारा शिक्षक समाज घडवत असतो. आज शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे आणि शिक्षकाच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. शिक्षण संस्था व्यावसायिक झाल्या आहेत आणि शिक्षकाच्या व्रतस्थपणाचेदेखील व्यावसायिक पेशात रूपांतर झाले आहे. या शिक्षण व्यवस्थेतील खरा
विवेकानंद महाविद्यालय दुसऱ्यांदा ठरले 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स' कोल्हापूर : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठातील एक गुणवत्ताप्राप्त व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणारे महाविद्यालय आहे. नुकताच या महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) 'कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स' हा दर्जा दिला असून या वर्षी महाविद्यालयाला एक कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language